Wednesday 5 June 2013

एकमेव-द्वितीय...!!!


नाजूक कळी…बालपणाच्या ऊबदार कुशीतून… नुकतीच बाहेर पडत होती… एक निरागस बाहुली… आत्ता कुठे हसायला लागली होती… गोड गुलाबी स्वप्नांच्या गर्दीत… रोजची पहाट जागी होत होती… पाकळी पाकळी बाजूला सारत.. ती उमलायचा प्रयत्न करत होती… खुलली न्हवती अजून तोवर… त्या नाजूक कळीला चिरडलं गेलं… एका विकृतीच्या निर्दयी पायाखाली… बिचारीचं अस्तित्वच तुडवलं गेलं…. अवघ्या दोन क्षणांच्या पाशवी आनंदासाठी… इतकं भयंकर कृत्य का करावं…? माणूसपण पुरून उरलेत… त्यांना माणूस तरी कसं म्हणावं…? नराधम हा शब्द सुद्धा… त्यांच्यासाठी पुरत नाही… एक निष्पाप फुल कुस्करताना… ज्यांना थोडीसुद्धा लाज वाटली नाही… कुठल्या दरी न्याय मागवा… तिने अब्रूची लक्तरं सांभाळत… चौका चौकातल्या चर्चेतून… पुन्हा पुन्हा होणार्या बलात्काराला तोंड देत… पण… फक्त या एका प्रसंगाने… ती खरंच कलंकित होईल का…? तिच्या सगळ्या स्वप्नांना… तिलांजली दिली जाईल का…? भेदरलेल्या त्या जीवाला… आपणच जवळ घ्यायला हवं… अन त्या राक्षसांना… सरळ फासावर द्यायला हवं… आपलीच मदत हवीये… तिचं अस्तित्व नव्याने फुलवायला… आपलाच आधार हवाय… तिला पुन्हा एकदा उभं रहायला… त्या काळोखातून बाहेर पडून… तिला एक हसरी पहाट दिसेल…. कोमेजलेली ती कळी… कदाचित पुन्हा एकदा नव्याने फुलेल…. जेव्हा तिला आपली साथ लाभेल…

1 comment: